पाणी

माहिती मिळवा व चर्चा करा

views

2:23
माहिती मिळवा व चर्चा करा. हे नेहमी लक्षात ठेवा: मुलांनो, पाणी आहे तर सर्व काही आहे. म्हणून पाणी हेच जीवन असे म्हंटले जाते. म्हणजे पाण्याला जीवनाएवढे महत्त्व दिले आहे. म्हणून आपण पाणी अडविले पाहिजे, जिरवले साठविले पाहिजे आणि काटकसरीने वापरले पाहिजे. आपण काय शिकलो?: मुलांनो, पाणी या पाठातून आपण पुढील बाबींचा अभ्यास केला: 1)पाण्यात सजीवांसाठी घातक किंवा अपायकारक पदार्थ मिसळले की पाणी प्रदूषित होते, म्हणजे ते पाणी पिण्यास योग्य राहत नाही. 2) अशा प्रदूषित पाण्यामुळे जलसाठयांचे प्रदूषण होऊ नये म्हणून त्यात सांडपाणी सोडण्यापूर्वी त्यावर अनेक प्रक्रिया करतात. 3) पाणीपुरवठा करण्यापूर्वी गावाच्या जलशुद्धीकरण केंद्रात पाण्यात विरघळलेले व न विरघळलेले पदार्थ निवळणे, गाळणे या पद्धतींचा वापर करून वेगळे केले जातात. तसेच पाण्याचे निर्जंतुकीकरण केले जाते. 4) एखादया वर्षी वा दीर्घकाळ पाऊस पडला नाही, तर दुष्काळ पडतो. 5) दुष्काळग्रस्त भागांतील प्राणी, वनस्पती या सर्वांना दुष्काळाचा तडाखा बसतो. त्यांना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतो. 6) पाणी अडवून, जिरवून किंवा साठवून पावसाळ्यानंतरच्या काळात पाणी उपलब्ध करून देणे, याला ‘जलव्यवस्थापन’ असे म्हणतात.