पाणी

काय करावे बरे?

views

4:55
काय करावे बरे? : मुलांनो, समजा आपल्या शाळेची सहल गावापासून दूर असलेला तलाव पाहण्यासाठी जाणार आहे. त्याठिकाणी आपल्याला दिवसभर लागणाऱ्या पाण्याची व्यवस्था करायची आहे, तर तुम्ही ती कशी कराल? जलव्यवस्थापन: मुलांनो, आपल्या संपूर्ण पृथ्वीला पावसामुळे पाणी मिळत असते. पावसामुळे हे पाणी आपल्याला पुन्हा पुन्हा उपलब्ध होत असते. वर्षातील साधारणपणे पावसाळ्याच्या चार महिन्यात आपल्याला पावसाचे पाणी मिळते. त्या पडलेल्या पावसाच्या पाण्यावर आपल्याला पुढील आठ महिने अवलंबून राहावे लागते. म्हणून मुलांनो, हे पावसाचे पाणी साठवणे किंवा जमिनीत मुरवणे हे खूप गरजेचे असते. म्हणून पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब आपण अडविला पाहिजे आणि तो जमिनीत कसा मुरेल यासाठी प्रयत्न केला पाहिजे. म्हणूनच म्हणतात ना पावसाचे पाणी थांबवायला शिका. थांबलेल्या पाण्याला जिरवायला शिका. मुलांनो, पाणी अडविण्याच्या व त्या जिरवण्याच्या आणखी काही पद्धती आहेत. काही ठिकाणी नदीच्या पात्रात विहिरी खोदून तेथे पाणी साठवण्याची व्यवस्था केली जाते. त्यामुळे त्या विहिरींमध्ये पाणी साठून राहते. रेन हार्वेस्टिंग हा एक पाणी साठविण्याचा नवीन प्रकार आहे. अशा प्रकारे आपल्याकडे उपलब्ध असलेल्या पाण्याचा काटकसरीने वापर करणे, पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत जिरवणे, किंवा पावसाचे पाणी टाक्यांमध्ये साठवणे महत्त्वाचे असते. अशा पद्धतीने पावसाच्या पडणाऱ्या थेंबा थेंबांचा योग्य वापर व नियोजन करून पावसाळ्यानंतरच्या काळातही पाणी उपलब्ध होईल अशी सोय करणे यालाच ‘जलव्यवस्थापन’ असे म्हणतात.