पाणी

सार्वजनिक जलशुद्धीकरण केंद्रातील प्रक्रिया:

views

3:00
सार्वजनिक जलशुद्धीकरण केंद्रातील प्रक्रिया: मुलांनो, दूषित पाणी शुध्द करण्यासाठी विविध पद्धती वापरल्या जातात, त्या पुढीलप्रमाणे आहेत: 1) निवळणे: पाणी शुध्द करण्याची पहिली पायरी म्हणजे पाणी निवळणे होय. यात गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या जलस्त्रोतांमधून आणलेले पाणी पाण्याच्या मोठमोठया टाक्यांमध्ये स्थिर राहू देतात. 2) गाळणी: दूषित पाणी शुध्द करण्याची दुसरी पायरी म्हणजे यंत्राद्वारे पाणी गाळून घेणे. यालाच गाळणी पद्धत म्हणतात. 3) ऑक्सिजनीकरण: पाणी शुध्द करण्याची तिसरी पायरी म्हणजे ऑक्सिजनीकरण होय. यामध्ये पंपाने पाण्यात हवा खेळवल्याने पाण्यात हवेतील ऑक्सिजन मिसळतो. 4) निर्जंतुकीकरण: पाणी शुध्द करण्याची ही चौथी पायरी आहे. अशुद्ध पाण्यात अनेक प्रकारचे जंतू असतात. त्यांना मारण्यासाठी त्या पाण्यात क्लोरीन मिसळली जाते. त्यामुळे जंतू नाहीसे होऊन पाणी शुध्द होते. अशाप्रकारे सार्वजनिक जलशुद्धीकरणासाठी वरील चार पद्धतींचा वापर करतात. माहीत आहे का तुम्हाला? : मुलांनो, आजकाल आपण आपल्याला तहान लागली की अनेक ठिकाणी पाणी विकत घेऊन पितो. उदा: रेल्वे, बसस्थानक, विमानतळ व इतर अनेक ठिकाणी पाण्याच्या बाटल्या विकत घेऊन आपण त्यातील पाणी पितो. मुलांनो, या बाटल्या कमी दर्जाच्या असतात. त्यांचा एकदा वापर झाल्यावर परत त्यांचा वापर करू नये. बाटलीतील पाणी संपल्यानंतर बाटली चुरगळून कचरापेटीत फेकावी, म्हणजे बाटलीचा पुन्हा वापर केला जाणार नाही.