पाणी

सांगा पाहू

views

3:47
सांगा पाहू : मुलांनो, सांगा पाहू, तुम्ही राहाता त्या प्रदेशात किंवा एखाद्या दुसऱ्या प्रदेशात बरेच वर्षे पाऊसच पडला नाही तर तेथील लोकांच्या जीवनावर कोणते परिणाम होतील? दुष्काळ: मुलांनो, बाष्पीभवन म्हणजे पाण्याची वाफ होणे. उष्णतेमुळे पाण्याचे वाफेत रुपांतर होणे म्हणजेच बाष्पीभवन होय. नद्या, तळी, विहिरी, बंधारे, धरणे यातील पाणी सूर्याच्या उष्णतेमुळे तापते. तापलेल्या पाण्याची वाफ होते. त्यामुळे त्या जलस्त्रोतांतील पाण्याची पातळी हळूहळू कमी-कमी होते. पाऊसच पडला नाही तर यांपैकी काही साठे कोरडेही पडतात. ही प्रक्रिया जिथे दुष्काळी भाग असतो. मुलांनो, अशा दुष्काळी परिस्थितीच्या वेळी लोकांना मदत करण्याचे काम शासनातर्फे केले जाते. दुष्काळी भागांतील लोकांना व जनावरांना तात्पुरते सुरक्षित ठिकाणी हलवले जाते. तसेच गरजेनुसार त्यांना धान्य, गुरांसाठी चारा व पाण्याचा पुरवठा केला जातो. पाणीपुरवठा करण्यासाठी पाण्याच्या टँकरचा वापर केला जातो. मागील तीन चार वर्षात लातूर या शहरात पाणी टंचाई निर्माण झाल्यामुळे लातूर शहराला मिरज येथील कृष्णा नदीतून रेल्वेने पाणी पुरवठा केला होता.