समांतर रेषा

समांतर रेषा

views

3:40
आज आपण भूमितीमधील समांतर रेषा म्हणजे काय हे जाणून घेणार आहोत. आपल्या वर्गात ही खिडकी दिसते.या खिडकीला काही आडवे गज लावलेले दिसतात की नाही? म्हणजेच हे दोन्ही गज एकमेकींना छेदत नाही याचाच अर्थ ज्या रेषा एकाच प्रतलात असतात परंतू एकमेकींना छेदत नाही. अशा रेषांना समांतर रेषा असे म्हणतात. वरील तिन्ही आकृतींचे निरीक्षण केले असता आपल्या असे लक्षात येते की, आकृती क्र.1 मध्ये दोन रेषा आहेत. पण यातील एका रेषेची लांबी जास्त आहे व एका रेषेची लांबी कमी आहे. मग त्या समांतर आहेत का? तर हो. त्या रेषा समांतर रेषा आहेत. कारण दुसरी रेष आपण वाढवली तर ती पहिल्या रेषेएवढी होवू शकते. तसेच या दोन्ही रेषा कितीही वाढवल्या तरी त्या रेषा एकमेकींना छेदणार नाहीत. म्हणून त्या समांतर रेषा आहेत. आकृती (2मध्ये) दोन रेषा एकमेकींना ‘o’ या बिंदूमध्ये छेदतात. म्हणून त्या समांतर रेषा नाहीत. आकृती (3) मध्ये दोन रेषा आहेत. रेषा l व रेषा m. या एकमेकींना छेदत नाही. म्हणून त्या समांतर रेषा आहेत. समांतर रेषा आहे हे आपण रेषा l || (समांतर) रेषा m अशा प्रकारे दाखवू शकतो.