समांतर रेषा

युक्लिडचे गृहतक

views

6:21
युक्लिडचे गृहतक दोन रेषा व त्यांची एक छेदिका काढली असता एका बाजूला तयार झालेल्या आंतर कोनांची बेरीज दोन काटकोनापेक्षा कमी असेल, तर त्या सरळरेषा त्याच दिशेने वाढवल्यावर एकमेकींना छेदतात. आंतर कोनांचे प्रमेय:- मुलांनो आता आपण आंतर कोनाच्या प्रमेयाचा अभ्यास करूया. प्रमेय :- दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर छेदीकेच्या कोणत्याही एका बाजूला असणारे आंतरकोन एकमेकांचे पूरककोन असतात. संगत कोनाचे व व्युत्क्रम कोनाचे गुणधर्म : प्रमेय1) :- दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेद्ल्यावर होणाऱ्या संगत कोनांच्या जोडीतील कोनांची मापे समान असतात. (पान क्र. 16 वरील आकृती 2.3 दाखवा). पक्ष :- रेषा l || रेषा m आहे आणि रेषा n ही छेदिका आहे. साध्य:- a = b सिदधता:- a + c = 180० (कारण हे रेषीय जोडीतील कोन आहेत.) समीकरण--- (1) b + c = 180० (समांतर रेषांचा आंतरकोनाचा गुणधर्म) समीकरण--- -(2) a + c = b+ c विधान 1 व 2 वरून ∴ a = b आहे.