समांतर रेषा

सरावासाठी उदाहरणे

views

3:31
आता आपण सरावासाठी काही उदाहरणांचा अभ्यास करूया. उदा1) आकृतीमध्ये y = 108० आणि x = 71० असेल तर रेषा m व रेषा n परस्परांना समांतर होतील का? कारण लिहा. (पान क्र.21 वरील आकृती 2.18 दाखवा). सिद्धता: x = 71० व y = 108० आहे. ∴ x + y = 71० + 108० = 179० झाले. ∴ x + y = 179० आहेत. x व y हे आंतरकोन आहेत. पण पूरककोन नाहीत. म्हणून रेषा m व n परस्परांना समांतर नाहीत. उदा2) आकृतीमध्ये जर a ≅ b आणि x ≅ y तर सिद्ध करा की रेषा l || (समांतर) रेषा n. (पान क्र.21 वरील आकृती 2.20 दाखवा). सिद्धता: रेषा l व रेषा m यांची रेषा k ही छेदिका आहे. ∴ a व b हे संगत कोन असून a ≅ b आहेत. ∴ रेषा l || रेषा m आहे. -------- (संगतकोन कसोटीवरून)---------समीकरण(1) रेषा m व रेषा n यांची p ही छेदिका आहे. ∴ x व y हे व्युत्क्रम कोन असून, x ≅ y आहे. ∴ रेषा m || रेषा n आहेत. -----------(व्युत्क्रम कोन कसोटीवरून)-------------- समीकरण(2) म्हणून रेषा l || रेषा n आहेत.------------- हे समीकरण 1 व 2 वरून सिद्ध झाले.