समांतर रेषा

समांतर रेषांच्या गुणधर्मांचा उपयोग

views

5:02
समांतर रेषा व त्याची छेदिका यांच्यामुळे होणाऱ्या कोनाच्या गुणधर्माचा उपयोग करून त्रिकोणाचा एक गुणधर्म सिद्ध करूया. रेषांच्या समांतरतेच्या कसोट्या: मुलांनो आता आपण रेषांच्या समांतरतेच्या कसोट्यांचा अभ्यास करणार आहोत. समांतर रेषांच्या गुणधर्माच्या व्यत्यासानुसार (inverse) खालील समांतर रेषांच्या कसोट्या सिद्ध होतात. 1) छेदीकेच्या एका बाजूच्या आंतरकोनांची जोडी पूरक कोनाची असेल, तर त्या रेषा समांतर असतात. 2) व्युत्क्रम कोनाची एक जोडी समान असेल तर त्या रेषा समांतर असतात. 3) संगत कोनाची एक जोडी समान असेल तर त्या रेषा समांतर असतात. समांतर रेषांची आंतरकोन कसोटी: प्रमेय: दोन भिन्न रेषांना एका छेदिकेने छेदले असता छेदीकेच्या एका बाजूच्या आंतरकोनांची बेरीज 180० असेल तर त्या रेषा समांतर असतात. पक्ष: रेषा AB व रेषा CD यांची रेषा xy ही छेदिका आहे. BPQ + PQD = 180० साध्य: रेषा AB || रेषा CD.