समांतर रेषा

सरावासाठी काही उदाहरणांचा अभ्यास

views

3:44
आता आपण सरावासाठी काही उदाहरणांचा अभ्यास करूया. उदा.1) आकृतीमध्ये रेषा P || रेषा q आणि रेषा l व रेषा m या छेदिका आहेत. काही कोनांची मापे दाखवली आहेत. त्यावरून a, b, c, d यांची मापे काढा. (पान क्र.17 वरील आकृती 2.6 दाखवा). a व त्याच्या लगतच्या कोनाचे माप 110० आहे. ∴ a + 110० = 180० ( हे रेषीय जोडीतील कोन आहेत.) ∴ a = 180० – 110० ∴ a = 70० आकृतीवरून a च्या विरुद्ध कोनाचे माप सुद्धा 70० आहे. कारण विरुद्ध कोन एकरूप असतात. हा विरूद्ध कोन व b संगत कोन आहेत. ∴ b = 70० आहे. C व 115० मापाचा कोन हे संगत कोन आहेत. ∴ C = 115० आहे. 115० मापाचा कोन व d हे रेषीय जोडीतील कोन आहेत. ∴115० + d = 180० ∴ d = 180० – 115० ∴ d = 65० ∴ a = 70०, b = 70०, c = 115०, d = 65०.