धाराविद्युत आणि चुंबकत्व

विभवांतर

views

3:58
विद्युत घटांच्या दोन बिंदूमध्ये असलेल्या विद्युत पातळीमधील फरकास विभवांतर असे म्हणतात. धबधब्याची उंची, उष्ण व थंड वस्तूंच्या तापमानातील फरक तसाच फरक विद्युत घटाच्या दोन बिंदुंमध्ये असतो. आता आपण विभवांतर कसे होते ते एका कृतीतून पाहूया. प्रथम तांब्याच्या जोडणीची तार घेऊन विद्युत परिपथ तयार करून घ्या. आता यांमध्ये तुम्हाला काय दिसते बरं? बल्बमधून विद्युतप्रवाह वाहत नाही असे दिसते. कारण यामध्ये विद्युत घट नसल्यामुळे कोणतेही विभवांतर होत नाही. म्हणून विद्युत प्रवाह वाहत नाही. आता याच परिपथात बाजारात मिळणारा एक दीड व्होल्टचा कोरडा विद्युत घट जोडा. आता तुम्हाला काय दिसते बरं? तारेतून विद्युतप्रवाह वाहत आहे हे बल्ब लागल्यामुळे कळले. दीड व्होल्टचा कोरडा विद्युत घट जोडल्यानंतर तारेतून विद्युतप्रवाह वाहत जाऊन बल्ब लागला. असे घडले कारण विद्युतघटाच्या दोन टोकांतील विभवांतरामुळे तारेतील इलेक्ट्रॉन प्रवाहित होऊन ते विद्युत घटाच्या ऋण टोकांकडून, धन टोकांकडे प्रवाहित होतात. सांकेतिक विद्युतप्रवाह हा उलट दिशेने वाहतो. या परिपथात विद्युत घटामुळे विभवांतर निर्माण झाल्याबरोबर स्थिर विद्युत प्रवाह वाहू लागतो. SI पद्धतीत विभवांतराचे एकक हे (Volt) आहे. व ते ‘v’ या इंग्रजी अक्षराने दर्शविले जाते. अलेक्झान्ड्रो व्होल्टा या इटालियन शास्त्रज्ञाने सर्वप्रथम विद्द्युत घट तयार केला. त्याच्या सन्मानार्थ विभवांतरच्या एककास ‘व्होल्ट’ हे नाव देण्यात आले.