धाराविद्युत आणि चुंबकत्व

विद्युत घंटा

views

1:52
तुम्ही घराच्या दारावरची घंटा पाहिली असेल. आता ही घंटा नेमकी वाजते कशी? यासाठी आपण ही घंटा खोलून पाहू. या घंटेमध्ये विद्युत चुंबकही दिसत आहे. तर आता आपण ही घंटा कशी वाजते ते पाहूया. तांब्याची तार ही एका लोखंडी तुकडयावर गुंडाळलेली असते. गुंडाळलेले कुंतल म्हणजे कॉईल विद्युत चुंबकाचे कार्य करते. एक लोखंडी पट्टी टोलासहित विद्युत चुंबकाजवळ बसवलेली असते. पट्टीच्या अगदीजवळ संपर्क होईल असा स्क्रू बसवलेला असतो. पट्टीला टेकलेला असतो. आकृतीत दाखवल्याप्रमाणे परिपथ जोडून तयार केलेला असतो. स्क्रू पट्टीला टेकलेला असताना त्याच्यामधून विद्युतप्रवाह प्रवाहित होतो. त्यामुळे कुंतलाचा विद्युत चुंबक तयार होतो, आणि तो लोखंडी पट्टीला स्वत:कडे आकर्षित करून घेतो. त्यामुळे घंटेवर टोला आदळून आवाज ऐकू येतो. मात्र त्याच वेळी संपर्क स्क्रूचा लोखंडी पट्टीशी असलेला संपर्क तुटतो आणि परिपथातील विद्युतप्रवाह खंडित होतो. त्यावेळेस विद्युतचुंबकाचे चुंबकत्व नाहीसे होते. व लोखंडी पट्टी ही परत संपर्क स्क्रूला चिकटते आणि परत विद्युतप्रवाह सुरु होऊन टोला पुन्हा घंटेवर आदळतो. ही क्रिया वारंवार होते आणि घंटा वाजते. अशाप्रकारे विजेची घंटा कार्य करते.