धाराविद्युत आणि चुंबकत्व

धारा विद्युतचे चुंबकीय परिणाम

views

3:36
चुंबकाचे चुंबकीय वस्तूवर तसेच अचुंबकीय वस्तूवर काय परिणाम होतात हे तुम्हाला माहीत आहे का? आता या धारा विद्युतचे चुंबकीय परिणाम काय होतात? परिपथात विद्युतप्रवाह चालू केल्यानंतर चुंबकसूचीची दिशा बदलते. आता आपण कळ खुली करूया. कळ खुली केल्यानंतर चुंबकसूची पुन्हा मूळ दिशेत स्थिरावते का? आपण ह्या प्रयोगावरून असे म्हणून शकतो, की चुंबकपट्टी चुंबकसूची जवळ नेल्यावर चुंबकसूची दिशा बदलते. तसेच परिपथात विद्युतप्रवाह सुरु केला तरीही चुंबकसूची दिशा बदलते. म्हणजेच याठिकाणी तारेतून विद्युतप्रवाह जातो तेव्हा चुंबकीय क्षेत्र निर्माण होते, असे मत सर्वप्रथम हान्स ख्रिस्तीअन ओरस्टेड या वैज्ञानिकाने मांडले. एखाद्या तारेतून विद्युतप्रवाह प्रवाहित झाला की चुंबकीय क्षेत्र निर्माण होते. अशाप्रकरे आपण धाराविद्युतचे चुंबकीय परिणाम प्रयोग करून प्रत्यक्ष पाहिले आहेत.