धाराविद्युत आणि चुंबकत्व

विद्युतघट

views

4:57
एखादया परिपथामध्ये विद्युतप्रभाराचा प्रवाह सतत निर्माण करण्यासाठी एका स्रोताची गरज असते. त्या स्त्रोताचे एक साधन म्हणजेच विद्युतघट होय. आज बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे विद्युतघट उपलब्ध आहेत. हे विद्युतघट वेगवेगळ्या प्रकारच्या उपकरणांमध्ये वापरले जातात. मनगटी घडयाळ, पाणबुडया, संगणक इत्यादी अनेक यंत्रांमध्ये ते वापरले जातात. द्युतघटकांपैकी सौरघट हे आपल्याला माहीतच आहेत. अशा वेगवेगळ्या विद्युतघटांचे मुख्य कार्य म्हणजे दोन टोकांमधील विभवांतर कायम राखणे हे आहे. विद्युतप्रभारावर हे विद्युतघट कार्य करून विभवांतर कायम ठेवण्यास मदत करतात. आता आपण विद्युत घटाच्या काही प्रकारांची माहिती जाणून घेऊया. आपल्या घरातील रेडिओमध्ये, भिंतीवरील घडयाळ्यामध्ये, तसेच विजेच्या बॅटरीमध्ये हे कोरडे विद्युतघट बसवलेले असतात. हे कोरडे विद्युतघट 3 ते 4 प्रकारच्या विविध आकारांमध्ये उपलब्ध आहेत.