धाराविद्युत आणि चुंबकत्व

विद्युत परिपथ

views

3:04
तुमच्या घरातील बल्ब प्रकाशित असताना तसेच बंद असतानाही पाहिला असेल. हा बंद बल्ब चालू करून प्रकाश देण्यासाठी जी जोडणी केली असते त्यालाच आपण विद्युत परिपथ असे म्हणतो. बल्ब व कळ हे जोडणीच्या विद्युत वाहक तारांनी जोडल्यावर घट धारकामध्ये कोरडा विद्युत घट बसवल्यास बल्ब प्रकाश देतो. म्हणजेच बल्बमधून विद्युतप्रवाह वाहतो व बल्ब प्रकाशमान होतो. पण जर आपण बल्बमधून विद्युतप्रवाह काढून घेतला की बल्ब बंद होऊन बल्बचे प्रकाशणे बंद होते. या अशा प्रकारच्या विद्युत घटकाच्या जोडणीलाच विद्युत परिपथ असे म्हणतात. विद्युतघट नेहमी + - या चिन्हाने दर्शविला जातो. आपल्या घरात विद्युत परिपथाची जोडणी केलेली असते. मात्र विद्युत पुरवठा घटाऐवजी बाहेरील तारांमार्फत केलेला असतो. कधी कधी विद्युत पुरवठा हा एकापेक्षा जास्त घटांच्या जोडणीतून मिळवला जातो. उदा: ट्रांझिस्टर रेडिओमध्ये 2 ते 3 कोरडे घट एकसर जोडणीत जोडलेले असतात. असे केल्याने एका घटाच्या विभवांतरापेक्षा जास्त विभवांतर मिळवता येतो. त्यामुळे जास्त विद्युतप्रवाह मिळतो.