भूमितीतील मुलभूत संबोध

दरम्यानता

views

5:21
आता आपण दरम्यानता म्हणजे काय ते पाहूया. : जर P, Q, R हे एकरेषीय भिन्न बिंदू असतील, तर खाली दिल्याप्रमाणे तीन शक्यता संभवतात. 1) बिंदू Q हा P आणि R च्या दरम्यान आहे. 2) बिंदू R हा P आणि Q च्या दरम्यान आहे. 3) बिंदू P हा R आणि Q च्या दरम्यान आहे. जर d(P,Q) + d(Q,R) = d(P,R) असेल तर Q हा बिंदू p आणि R च्या दरम्यान आहे असे म्हणतात. म्हणून ही दरम्यानता p दरम्यान Q दरम्यान R (P – Q – R) अशी लिहतात. आपण काही उदाहरणांच्या साहयाने दरम्यानता समजून घेवूया. उदा1) एका संख्येरेषेवर A, B आणि C हे बिंदू असे आहेत की; d(A,B)= 5, d(B,C)=11 आणि आणि d(A,C) = 6 तर त्यांपैकी कोणता बिंदू इतर दोन बिंदूच्या दरम्यान असेल? एका रस्त्यावर सरळ रेषेत U,V व A ही शहरे आहेत. U व A यांमधील अंतर 215 किमी आहे. V व A मधील अंतर 140 किमी व U व V यामधील अंतर 75 किमी आहे. तर कोणते शहर कोणत्या दोन शहरांच्या दरम्यान आहे. उदा3) एका संख्येरेषेवरील A बिंदूचा निर्देशक 5 आहे. तर त्याच रेषेवरील A पासून 13 एकक अंतरावरील बिंदूचे निर्देशक काढा. मुलांनो संख्यारेषेवर धन संख्या व ऋण संख्या देखील असतात. म्हणून आपण A या बिंदूपासून दोन्ही बाजूंनी 13 एकक अंतरावर असणारे निर्देशक काढू.