भूमितीतील मुलभूत संबोध

प्रत्यक्ष सिद्धता

views

4:58
एखादया गुणधर्माची तर्कशुद्ध सिद्धता देता येत असेल तर तो गुणधर्म सत्य मानला जातो. त्यासाठी केलेल्या तर्कशुद्ध मांडणीला त्या गुणधर्माची म्हणजेच त्या प्रमेयाची सिद्धता असे म्हणतात. एखादे सशर्त विधान सत्य आहे. असे आपल्याला सिद्ध करायचे असते. तेव्हा त्यातील पूर्वांगाला पक्ष आणि उत्तरांगाला साध्य म्हणतात. सिद्धतेचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असे दोन प्रकार आहेत. एकमेकांना छेद्णाऱ्या दोन रेषांनी केलेल्या कोनाच्या गुणधर्माची प्रत्यक्ष सिदधता देऊ. प्रमेय: दोन रेषा एकमेकींना छेदल्यामुळे होणारे परस्पर विरुद्ध कोन समान मापाचे असतात. पक्ष: रेषा AB आणि रेषा CD या परस्परांना O बिंदूत छेदतात. A दरम्यान O दरम्यान B, आणि C दरम्यान O दरम्यान D आहे. (A – O - B, C – O – D)