भूमितीतील मुलभूत संबोध

सशर्त विधाने आणि व्यत्यास

views

4:38
जी विधाने जर तर रूपात लिहीता येतात त्यांना सशर्त विधाने असे म्हणतात. सशर्त विधानातील ‘जर’ किंवा ‘जेव्हा’ ने सुरु होणाऱ्या विधानास पूर्वांग (पूर्वार्ध) आणि ‘तर’ किंवा ‘तेव्हा’ ने सुरु होणाऱ्या विधानास उत्तरांग (उत्तरार्ध) असे म्हणतात. जर दिलेला चौकोन समभुज असेल तर त्याचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात. एखादे सशर्त विधान दिले असेल आणि त्यातील पूर्वांग व उत्तरांग यांची अदलाबदल केली तर मिळणारे नवीन विधान हे मूळ विधानाचा व्यत्यास आहे असे म्हणतात. एखादे सशर्त विधान सत्य असेल तर त्याचा व्यत्यास हा सत्य असतोच असे नाही. यासाठी पुढील उदाहरणे पहा. उदा:1) सशर्त विधान: जर एखादा चौकोन समभूज असेल तर त्याचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात. व्यत्यास : जर एखादया चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतील तर तो चौकोन समभुज असतो. या उदाहरणात मूळ विधान व त्याचा व्यत्यास हे दोन्ही विधाने सत्य आहेत.