भूमितीतील मुलभूत संबोध

जाणून घेऊया

views

5:45
मुलांनो आता आपण रेषाखंड, किरण, रेषा यांचे वर्णन बिंदूसंच रूपात कसे करतात ते पाहूया. रेषाखंड बिंदू A, बिंदू B या दोन बिंदूच्या दरम्यानचे सर्व बिंदू यांचा संयोगसंच म्हणजे रेषाखंड AB असतो. रेषाखंड AB हे थोडक्यात रेख AB असे लिहतात. रेख AB म्हणजेच रेख BA. बिंदू A व बिंदू B हे रेख AB चे अंत्यबिंदू आहेत. रेषाखंडाच्या अंत्यबिंदूमधील अंतराला त्या रेषाखंडाची लांबी म्हणतात. l(AB) = d(A,B) = l(AB). रेषाखंड म्हणजे मर्यादित बिंदूंचा संच. रेषाखंड हा रेशेचाच एक उपघटक असतो. l(AB) = 5 हे AB = 5 असेही लिहतात. किरण AB : A आणि B हे दोन भिन्न बिंदू आहेत. रेख AB वरील बिंदू आणि A दरम्यान B दरम्यान P (A-B-P) असे सर्व बिंदू P यांचा संयोगसंच म्हणजे किरण AB होय. रेषा AB : किरण AB चा बिंदूसंच आणि त्याच्या विरुद्ध किरणाचा बिंदूसंच मिळून जो संयोगसंच तयार होतो. तो म्हणजे रेषा AB हा बिंदूसंच आहे. रेख AB चा बिंदूसंच हा रेषा AB च्या बिंदूसंचाचा उपसंच आहे. म्हणजेच रेख AB हा रेषा AB चा उपघटक आहे.