भूमितीतील मुलभूत संबोध

उदाहरणे

views

4:31
आपण काही उदाहरणे सोडवूया. पुढील सारणीत संख्यारेषेवरील बिंदूंचे निर्देशक दिले आहेत. त्यावरून पुढील रेषाखंड एकरूप आहेत का ते ठरवा. 1) रेख DE व रेख AB 2) रेख BC व रेख AD 3) रेख BE व रेख AD. अ) रेख DE व रेख AB सिद्धता: इथे D चा निर्देशक –7 आहे व E चा निर्देशक 9 आहे. म्हणून 9 – (-7) = 9 + 7 = 16. म्हणून l(DE)= 16 आहे. तसेच रेख A चा निर्देशक = -3 व B चा निर्देशक 5 आहे . म्हणून 5 – (-3) = 5 + 3 = 8 म्हणून l(AB)= 8 आहे. यावरून DE चे अंतर 16 व AB चे अंतर 8 आहे. म्हणजेच l (DE) ≠ (असमान) l (AB) आहे. ∴ रेषाखंड DE व रेषाखंड AB एकरूप नाहीत.