आम्ल, आम्लारी ओळख

दर्शक

views

3:40
रासायनिक दृष्टया उदासीन असणारे पदार्थ हे आम्लधर्मी किंवा आम्लारीधर्मी नसतात. आम्ल किंवा आम्लारी पदार्थांची चव घेणे किंवा त्या पदार्थांना स्पर्श करणे हे धोक्याचे असते. त्यामुळे आम्ल किंवा आम्लारी हे पदार्थ ओळखणे खूप महत्त्वाचे असते. त्यासाठी विशिष्ट अशा पदार्थांचा दर्शक म्हणून उपयोग केला जातो. दर्शक म्हणजे दाखवणारा. म्हणजेच, ‘’ जे पदार्थ आम्ल किंवा आम्लारीच्या संपर्कात आल्याने स्वत:चा रंग बदलतात त्या पदार्थांना दर्शक असे म्हणतात.’’ आम्ल व आम्लारी पदार्थ ओळखण्यासाठी प्रयोगशाळेमध्ये ‘लिटमस’ कागदाचा वापर करतात. हा लिटमस कागद लायकेन म्हणजेच दगडफूल या वनस्पतीच्या अर्कापासून म्हणजेच रसापासून तयार केला जातो. लिटमसचा कागद हा तांबड्या किंवा निळ्या रंगाचा असतो. ‘’निळा लिटमस कागद हा आम्लात बुडवला की तांबडा होतो. व तांबडा लिटमस कागद आम्लारीमध्ये निळा होतो.“ तसेच प्रयोगशाळेमध्ये ‘फिनॉल्फथॅलिन, मिथिल ऑरेंज व मिथिल रेड’ यांचे द्रावण हे दर्शक म्हणून वापरले जातात. मिथिल ऑरेंज हा दर्शक आम्लात टाकला की गुलाबी होतो. आणि आम्लारीत टाकला की पिवळा होतो. तर फिनॉल्फथॅलिन आम्लामध्ये रंगहीन आणि आम्लारीमध्ये गुलाबी असतो.