आम्ल, आम्लारी ओळख

जरा डोके चालवा

views

3:53
लिंबू, कैरी, यांसारखे पदार्थ हे आंबट असतात, त्यामध्ये आम्ल असते. आणि या आम्लामुळे सुरीच्या पात्यावर असणारा क्षारांचा थर हा विरघळतो व सुरीचे पाते उजळते. 1) खनिज आम्ले शरीराला अपायकारक असतात. मात्र सेंद्रीय आम्ले आपल्या शरीरात व वनस्पतींमध्ये असतात आणि ती हितकारक असतात. 2) आपल्या शरीरात DNA म्हणजेच डि ऑक्सिरायबो न्यूक्लिक अॅसिड हे आम्ल असते, जे आपल्यात असणारे अनुवांशिक गुण ठरवते. 3) प्रोटीन हा शरीरातील पेशींचा भाग असतो व तो अॅमिनो अॅसिडपासून बनलेला असतो. 4) शरीरातील मेद (fat) हा मेदाम्लापासून (Fatty Acid) बनलेला भाग असतो. यावरून आपल्या लक्षात येते की, शरीराला आम्लाची खूप गरज असते. परंतु काही आम्ले ही शरीराला हितकारक असतात तर काही आम्ले ही अपायकारकही असतात.