आम्ल, आम्लारी ओळख

करून पहा

views

4:46
आता आपण पदार्थ आम्ल किंवा आम्लारी आहेत हे ओळखण्यासाठी एक कृती करूया. त्यासाठी खाण्याचा सोडा घ्या. त्यात थोडे पाणी घाला. आता हे द्रावण लिंबाचा रस, व्हिनेगर, संत्रारस किंवा सफरचंदाचा रस अशा पदार्थांवर टाका. आता मला सांगा खाण्याच्या सोडयाचे पाण्यातील द्रावण फळांच्या रसात टाकल्यावर तुम्हाला काय दिसून आले? आम्लधर्मी पदार्थाच्या द्रावणात खाण्याच्या सोडयाचे पाण्यामधील द्रावण टाकले की बुडबुडे येतात. किंवा ते फसफसते. तसेच हळदीपासून बनवलेल्या दर्शक कागदी पट्ट्यांचा पिवळा रंग काही विशिष्ट पदार्थांच्या पाण्यातील द्रावणात लाल होतो. म्हणजेच यावरून आपण असे म्हणू शकतो की आम्लारीधर्मी पदार्थांमध्ये हळदीच्या दर्शक कागदाचा रंग हा लाल होतो. आता व्हिनेगर, लिंबाचा रस, अमोनिअम हायड्राक्साईड (NH4OH) आणि विरल हायड्रोक्लोरिक आम्ल (HCl) यांचे नमूने वेगवेगळ्या परीक्षा नळीत घ्या. 1) लिंबू रसाच्या द्रावणात तांबडा लिटमस पेपर तांबडाच राहतो. मात्र निळा लिटमस पेपर तांबडा होतो. फिनॉल्फथॅलीनचे थेंब टाकल्यास द्रावण रंगहीन होते तर मिथिल ऑरेंज टाकल्यास द्रावणाचा रंग गुलाबी होतो. यावरून लिंबू रस आम्लधर्मी आहे. 2) अमोनिअम हायड्रोक्साईडच्या द्रावणात तांबडा लिटमस निळा होतो. निळा लिटमस निळाच राहतो. फिनॉल्फथॅलीनचे थेंब टाकल्यास द्रावण गुलाबी होते तर मिथिल ऑरेंजचे थेंब टाकल्यास रंग पिवळा होतो. यावरून ते आम्लारीधर्मी आहे. 3) याचप्रमाणे हायड्रोक्लोरिक आम्ल (HCL) व बायकार्बोनेटवर (HCO3) लिटमस पेपर आणि फिनॉल्फथॅलीन व मिथिल ऑरेंजचा होणारा परिणाम या तक्त्यात दर्शविला आहे. अशाप्रकारे या प्रयोगातून आपल्या लक्षात येते की, आम्लात लिटमसचा निळा रंग बदलून तांबडा होतो आणि आम्लारीत तांबडा लिटमस हा निळा होतो. तसेच मिथिल ऑरेंजचा नारंगी रंग आम्लात गुलाबी होतो. तर रंगहीन असलेला फिनॉल्फथॅलिन हा आम्लारीत बुडवला की गुलाबी होतो.