आम्ल, आम्लारी ओळख

आम्ल

views

3:36
आम्लामध्ये हायड्रोजन हा प्रमूख घटक असतो. त्यामूळे आम्ल हे चवीने आंबट असते. आम्लाचे पाण्यातील द्रावण हायड्रोजन (H+) आयन उपलब्ध करून देते म्हणजेच निर्माण करते. उदा. पाण्यातील द्रावणात हायड्रोक्लोरिक आम्लचे (HCl)(aq) विघटन होऊन हायड्रोजन आयन व क्लोराइड आयन तयार होते. Hcl (aq) H+ + Cl - अशाप्रमाणे हायड्रोजन हा आयन निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावत असतो. आता आपण आम्लांची उदाहरणे पाहूया. आम्लांची काही उदाहरणे: हायड्रोक्लोरिक आम्ल (Hcl), नायट्रिक आम्ल (HNO3), सल्फ्युरिक आम्ल (H2SO4), शीतपेयांमधील कार्बोनिक आम्ल (H2CO3) लिंबू आणि काही फळांत असणारे अॅस्कॉर्बिक आम्ल, सायट्रिक आम्ल, व्हिनेगरमध्ये असणारे अॅसेटिक आम्ल. अशा प्रकारची आम्लांची उदाहरणे सांगता येतील. तसेच आपल्या रोजच्या वापरातील खाद्यपदार्थांमध्ये नैसर्गिक (सेंद्रीय) आम्ले असतात. ती सौम्य प्रकृतीची असतात, त्यामूळे ती खनिज आम्लांप्रमाणे हानिकारक किंवा अपायकारक नसतात.