आम्ल, आम्लारी ओळख

उदासिनीकरण

views

2:04
उदासिनीकरण ही संज्ञा निरनिराळ्या शास्त्रांमध्ये वेगवेगळया अर्थाने वापरली जाते. मात्र रसायनशास्त्रामध्ये आपण असे म्हणू शकतो की, ‘आम्लता नाहीशी करणारी रासायनिक प्रक्रिया म्हणजे उदासिनीकरण होय.’ उदा. हायड्रोजन आयन (H+) व हायड्रॉक्साईड आयन (OH-) यांपासून पाणी निर्माण होते. म्हणजेच आम्लामध्ये हायड्रोजन (H+) आयन असतात व आम्लारीमध्ये हायड्रॉक्साइड आयन (OH-) असतात. आम्ल व आम्लारीचा संयोग घडून आला की क्षार व पाणी निर्माण होते. उदा. हायड्रोक्लोरिक आम्ल व सोडिअम हायड्रॉक्साईडची अभिक्रिया होऊन सोडिअम क्लोराईडचा क्षार आणि पाणी तयार होते. आम्ल (HCL) + आम्लारी (NaOH) क्षार (Nacl) + पाणी (H2O)