माहिती संप्रेषण तंत्रज्ञान : प्रगतीची नवी दिशा

संगणकाच्या पिढ्या

views

5:07
संगणकामध्ये वेगवेगळ्या टप्यावर विकास होत गेला. संगणकाच्या विकासाचे टप्पे संगणकात वापरले जाणारे तंत्रज्ञान यांच्या कालखंडानुसार केले आहेत त्यालाच ‘संगणकाची पिढी’ असे म्हणतात. संगणकामध्ये वेळोवेळी बदल होत गेले. पहिली पिढी :- पहिल्या पिढीतील संगणकात व्हॅकयूम ट्यूब म्हणजेच निर्वात नलिकेचा वापर होट होता व हा संगणक आकाराने खूप मोठा होता त्यामुळे याला वीजसुद्धा जास्त लागत नाही. व उष्णतेमुळे हा संगणक लवकर बिघडत होता. दुसरी पिढी :- दुसऱ्या पिढीतील संगणकात व्हॅकयूम ट्यूबच्या जागी ट्रान्झिस्टसचा वापर करण्यात आला त्यामुळे पहिल्या पिढीतल्या संगणकापेक्षा हा संगणक आकाराने कमी झाला व याचा वेग वाढला व विजेचा वापरपण कमी होऊ लागला. तिसरी पिढी :- तिसऱ्या पिढीतल्या संगणकामध्ये इंटीग्रेटेड सर्किट (IC) चा वापर करण्यात येऊ लागला. चौथी पिढी :-या पिढीतील संगणकात मायक्रोप्रोसेसरचा उपयोग केल्या गेला. मॅग्नेटिक कोअर मेमरीऐवजी सेमी कंडकटर मेमरीचा वापर केला. 5. पाचवी पिढी :-या पिढीतील संगणकात दोन,चार,आठ इतक्या कोअरचा वापर करण्यात येत आहे. या संगणकातील मल्टीपल कोअर वापरामुळे संगणकाचा वेगात प्रचंड प्रमाणात वाढ झाली व संगणकाचा आकार इतका कमी झाला की तो आपण जवळही बाळगू शकतो. सुपर कॅम्प्यूटर :- पुण्याचे संगणक शास्त्रज्ञ डॉ.विजय भटकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी पहिला सुपर कम्प्युटर ‘परम’ तयार केला आहे. यामध्ये अनेक मायक्रोप्रोसेसर एकमेकांना जोडून पलरल प्रोसेसिंग म्हणजेच समांतर प्रक्रियेचा वापर करून समस्या किंवा गुंतागुंतीच्या क्रिया विभागल्या जातात. संगणक वापर क्षेत्रे :- मानवाच्या रोजच्या जीवनात सगळ्याच ठिकाणी संगणकाचा वापर मोठ्या प्रमाणात केल्या जात आहे. प्रत्येक क्षेत्रात संगणकाचा वापर केला जात आहे. त्यामुळे वेळही वाचतो व कामात अचूकता येते.