माहिती संप्रेषण तंत्रज्ञान : प्रगतीची नवी दिशा

विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये माहिती संप्रेषणाचे महत्त्व

views

5:00
software तयार करण्याचे आवाहन या क्षेत्रापुढे आहे व हे काम करण्यासाठी विविध कंपन्या या क्षेत्रात उतरलेल्या वापरकर्त्याच्या गरजेनुसार व मागणीनुसार application software तयार केले जाते. आपल्या देशामध्ये संगणक तयार करणाऱ्या बऱ्याच कंपनी आहेत. तसेच काही कंपन्या हया बाहेरच्या देशातून संगणक विकत आणून विकतात. तसेच ते संगणक दुरुस्त करता येण्यासाठी तसेच ते कार्यक्षम रहावेत बंद पडू नयेत म्हणून विविध कंपन्या हया कामासाठी रोजगार उपलब्ध करून देतात. संगणकाचे क्षेत्र इतके मोठे व व्यापक आहे की वेगवेगळ्या क्षेत्रातील application नुसार प्रशिक्षण घ्यावे लागते. आता तर शालेय स्तरावरही संगणक विद्यार्थांना हाताळता यावा यासाठी प्रशिक्षण दिले जाते. संगणक व त्याला पूरक असणारी सामग्री तयार करणाऱ्या खूप मोठया संस्था आहेत तशाच विक्री संस्थाही आहेत. त्यासाठी विक्री संस्थाही आहेत. त्यासाठी विक्रीत कुशल व प्रशिक्षित लोक पाहिजे. त्यामुळे संगणकाची कार्यपद्धती माहीत असण्याबरोबर मार्केटिंग मधील कौशल्य असेल तर या क्षेत्रातही खूप मोठया प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. संगणक क्षेत्रातील प्रगत संस्था म्हणून c-DAC या संस्थेला ओळखले जाते. C-DAC= Centre for Development of Advance Computing ही संस्था भारतातील प्रमुख संस्था पुणे इथे आहे. संगणक क्षेत्रातील या संस्थेने पहिल्या सुपर कॉम्प्यूटरची निर्मिती केली. या संगणकाला परम संगणक म्हणून ओळखले जाते. व या परम संगणकाच्या निर्मितीसाठी जैष्ठ शास्त्रज्ञ डॉ.विजय भटकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. परम म्हणजेच सर्वश्रेष्ठ हा संगणक प्रतिसेकंद एक अब्ज इतके गणिते करू शकतो.