माहिती संप्रेषण तंत्रज्ञान : प्रगतीची नवी दिशा

वर्ड प्रोसेसर

views

5:08
संगणकाचे मेमरी, ऑपरेटिंग सिस्टीम, प्रोग्राम, डेटा, इन्फॉमेशन हे संगणकाचे घटक आहेत. 1. मेमरी :- संगणकमध्ये सूचना किंवा माहिती साठवली जाते. ही माहिती मेमरीमध्ये साठवली जाते. कॉम्प्यूटरमध्ये दोन प्रकारची मेमरी असते. 1. Internal Memory : 1. RAM 2. ROM. 2. External Memory :- हार्डडिस्क, कॉम्पकट डिस्क, फ्लॉपी डिस्क, पेन ड्राइव्ह. रोम (Read only memory) :- ही मेमरी कायम]स्वरुपाची] असते. ही मेमरी आपण वाट्य शकतो मात्र या माहिती मध्ये आपण कोणत्याही प्रकारचा बदल करू शकत नाही. एक्स्टनल मेमरी (External Memory) :- ही मेमरी कायमस्वरुपाची असते. व यामध्ये आपण आपल्या गरजेनुसार बदल करू शकतो. ही माहिती साठवण्यासाठी मग्नेटिक हार्ड डिस्क,फ्लॉपी डिस्क, optical cd, DVD, पेन ड्राइव्ह,कॉम्पकट डिस्क यांचा उपयोग केला जातो. 2.ऑपरेटींग सिस्टीम :- ऑपरेटिंग सिस्टीमशिवाय आपण कॉम्प्यूटरचा वापर करू शकत नाही. कॉम्पुटर व त्यावर काम करणारी व्यक्ती यांच्या सुसंवाद साधण्यासाठी या प्रोग्रॅमचा उपयोग केल्या जातो. यालाच आपण DOS (Disk Operating system) असे म्हणतो. 3. प्रोग्रॅम : संगणकाला देण्यात येणाऱ्या सूचनांचा म्हणजेच ‘कमांडचा’ समूह म्हणजे प्रोग्रॅम होय.याच प्रोग्रॅमला software असे ही म्हणतात. 4. डेटा : डाटा म्हणजे कच्या स्वरूपातील माहिती जसे मजकूर, अंक, ध्वनी व चित्र स्वरूपातील कच्ची माहिती असते या माहितीवर कोणत्याच प्रकारची प्रक्रिया केलेले नसते.