मानवनिर्मित पदार्थ

प्लॅस्टिक आणि पर्यावरण

views

3:17
तुमच्या घरात रोज प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये दूध, भाजीपाला व इतर सामान आणले जाते. त्या पिशव्यांतील सामान काढून घेतल्यानंतर रिकाम्या पिशव्यांचे काय करतात? त्यांचा उपयोग दुसरे काही ठेवण्यासाठी केला जातो किंवा त्या फेकून दिल्या जातात. त्या पिशव्या फेकून दिल्यानंतर त्यांचे विघटन होत नाही. बरं सांगा वापर करून फेकून दिलेल्या कॅरीबॅग, पाण्याच्या बाटल्या, दुधाच्या रिकाम्या पिशव्या यांचे पुनर्चक्रीकरण कसे होते? प्लॅस्टिक बाटल्यांपासून पॉलिस्टर धाग्याची निर्मिती करता येते. तर दुधाच्या पिशवीपासून शोभेच्या वस्तू बनवल्या जातात. कॅरी बॅगचा मात्र नंतर काहीच उपयोग होत नाही असे म्हणतात. काही पदार्थांचे नैसर्गिकरीत्या विघटन होते, अशा पदार्थांना विघटनशील पदार्थ म्हणतात. तर काही पदार्थांचे नैसर्गिकरीत्या विघटन होत नाही, म्हणून त्यांना अविघटनशील पदार्थ म्हणतात.