मानवनिर्मित पदार्थ

काच

views

4:01
तुमच्या घरामध्ये, शाळेमध्ये, आजूबाजूच्या परिसरामध्ये काचेच्या वस्तू पाहिल्या असतील. मग सांगा बरं काचेचा वापर कशा कशासाठी केला जातो? घरात काचेचे ग्लास, बरण्या असतात. टी.व्ही. चा स्क्रीनही काचेचा असतो. तसेच खिडक्यांना काचा बसवलेल्या असतात. लोंबणारे झुंबर काचेचे असते. गाडीच्या खिडक्या काचेच्या असतात. प्रयोगशाळेतील नळ्या, चंचूपात्र काचेचे असते. बल्ब, ट्युबलाईट, काचेचे असतात. हल्ली जेवणाच्या टेबलावरही काच घालतात. फुलदाण्या, आरसे काचेचे असतात. घड्याळे, मायक्रोव्हेव ओव्हनचे दार यासाठीही काच वापरतात. काचेचा आपण रोजच्या जीवनात अनेक ठिकाणी वापर करत असतो. काचेचा शोध मानवाला अचानक लागला. काही फेनेशियन व्यापारी वाळवंटामध्ये रेतीवर स्वयंपाक करत होते.