मानवनिर्मित पदार्थ

थर्मोकोल

views

3:02
सांगा वाहतूक करताना काचेसारख्या वस्तू फुटू नयेत म्हणून त्याभोवती कोणत्या पदार्थाचे आवरण घातले जाते? थर्मोकोलचे. आता आपण थर्मोकोलविषयी माहिती जाणून घेऊ. थर्मोकोल आज बऱ्याच वस्तूंच्या पॅकिंगसाठी वापरले जाते. तुमच्या घरातही एखादी नवीन वस्तू आणली असेल तर त्या वस्तूच्या पॅकिंगमध्ये थर्मोकोलचा वापर केलेला दिसतो. वस्तू फुटू नयेत किंवा वस्तूला कोणतेही नुकसान होऊ नये म्हणून खोक्यात थर्मोकोलचे आवरण असते. बऱ्याच वेळा जेवणाच्या प्लेट, ग्लास, वाट्या ह्या थर्मोकोलपासून बनवलेल्या आपल्याला दिसून येतात. तसेच घरात बसण्याच्या बिन बॅगमध्ये कधी-कधी थर्मोकोलचा वापर केला जातो. थर्मोकोल हे पॉलीस्टायरीन या संश्लिष्ट पदार्थाचे एक रूप आहे. ते 100०C पेक्षा जास्त तापमानावर द्रव अवस्थेत जाते आणि थंड केल्यानंतर ते स्थायू अवस्थेत जाते. त्यामुळे आपण त्याला हवा तसा आकार देऊ शकतो. ते धक्काशोषक असल्याने नाजूक वस्तूंच्या संरक्षक आवरणात थर्मोकोलचा वापर केला जातो. थर्मोकोल आपण दैनंदिन जीवनात कुठे ना कुठे वापरतोच. मात्र थर्मोकोलचा पर्यावरणावर व मानवी आरोग्यावर घातक परिणाम होतो.