मानवनिर्मित पदार्थ

काचेचे प्रकार व उपयोग

views

2:59
काचेचे सिलिका काच, बोरोसिलिकेट काच, अल्कली सिलिकेट काच, शिसेयुक्त काच, प्रकाशीय काच, रंगीत काच, संस्कारित काच असे प्रकार आहेत. वेगवेगळ्या वस्तू विशिष्ट काचेपासून बनलेल्या असतात. तर आता आपण काचेचे विविध प्रकार व उपयोग अधिक विस्ताराने जाणून घेऊ. सिलिका काच: सिलिका काच तयार करताना सिलिकाचा वापर केला जातो. सिलिका काचेपासून तयार केलेल्या वस्तू उष्णतेमुळे कमी प्रमाणात प्रसरण पावतात. तसेच आम्ल किंवा आम्लारींचा या काचेवर काहीही परिणाम होत नाही. त्यामुळे प्रयोगशाळेतील काचेच्या वस्तू ह्या सिलिका काचेपासून तयार केलेल्या असतात.