मानवनिर्मित पदार्थ

काचेचा पर्यावरणावर होणारा परिणाम

views

3:14
काच तयार करताना ते मिश्रण 1500०c इतके तापवावे लागते. त्यामुळे यासाठी लागणाऱ्या इंधनांच्या ज्वलनामधून सल्फर डायऑक्साइड, नायट्रोजन डायऑक्साइड, कार्बनडाय ऑक्साईड असे हरितगृह वायू बाहेर सोडले जातात. त्यांचा पर्यावरणावर वाईट परिणाम होतो. म्हणून आपण काचेचे पुनर्चक्रीकरण केले पाहिजे. आणि आपले पर्यावरण वाचवले पाहिजे. काच ही अविघटनशील आहे. त्यामुळे काचेचे उपयोगात नसलेले तुकडे पाण्याबरोबर जलाशयात वाहून जातात. त्यामुळे पाण्यातील अधिवासावर अवलंबून असणाऱ्या जीवांना हानी पोहचते. तसेच काचेच्या तुकड्यांमुळे सांडपाण्याची विल्हेवाट लावणारी गटारे तुंबतात. त्यामुळे विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. अशा प्रकारे काचेचे पर्यावरणावर अनेक परिणाम होत असतात. हे परिणाम टाळण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. हे एक आपले सामाजिक कर्तव्य आहे. तुम्ही मला सांगा सूर्यप्रकाशामुळे अपघटन होऊ नये म्हणून काही विशिष्ट पदार्थ कोणत्या प्रकारच्या काचेच्या बाटलीमध्ये साठवले जातात? एम्बर रंगाच्या म्हणजे पिवळसर – तपकिरी बाटल्यांत काही विशिष्ट पदार्थ साठवले जातात.