नकाशाप्रमाण

प्रस्तावना

views

3:42
आपल्याकडे अनेक प्रकारचे नकाशे उपलब्ध असतात. जगाचा, देशाचा, राज्याचा, जिल्ह्याचा, तालुक्याचा, गावाचा तसेच एखादया विशिष्ट खंडाचा असे अनेक प्रकारचे नकाशे आपण विविध कारणांसाठी वापरतो. ज्यावेळी पृथ्वीचा बराच भाग लोकांना अज्ञात होता, त्यावेळी ज्या दर्यावर्दी लोकांनी समुद्रप्रवास केला आणि जे नकाशे तयार केले त्यांचा उपयोग करून अनेक खंडांचे शोध इतर प्रवाशांना लावता आले. यावरून लक्षात येते की, भौगोलिक गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी नकाशे खूप आवश्यक असतात. पहिल्या चित्रात चित्रकार चित्र काढण्यासाठी प्रथम पेन्सिलीने समोरील दृश्याचे अंदाजे प्रमाण घेतो. त्यानंतर त्या दृश्याचा आराखडा कागदावर काढून घेतो. पेन्सिलच्या साहाय्याने तयार केलेला हा आराखडा योग्य आहे असे लक्षात आल्यानंतर त्यात रंग भरले जातात. चित्र प्रमाणबद्ध येण्यासाठी चित्रकार पेन्सिल हातात तशी पकडून माप घेत असतो. नकाशे तयार करण्यासाठी सर्वप्रथम ज्या भूभागाचा नकाशा तयार करायचा असेल त्या भूभागाचे सर्वेक्षण केले जाते. म्हणजे त्या भागाची पाहणी करून त्याची उंची, क्षेत्रफळ, तसेच इतर काही भौगोलिक घटक यांची प्रत्यक्ष माहिती घेतली जाते. असे करीत असताना विशिष्ट प्रकारे प्रमाण निश्चित केले जाते. निश्चित केलेल्या प्रमाणानुसार आराखडे तयार करून त्याच्या आधारे पृथ्वी किंवा तिच्या एखाद्या भागाचा नकाशा तयार केला जातो.