नकाशाप्रमाण

सांगा पाहू!

views

3:30
नकाशाप्रमाण ठरविताना किंवा ते निश्चित करीत असताना नकाशातील दोन बिंदूंमधील अंतर व त्याच दोन बिंदूंमधील जमिनीवरील प्रत्यक्ष अंतर यांचा परस्परसंबंध ठेवावा लागतो. उदा. कराड ते मुंबई या दोन ठिकाणांतील प्रत्यक्ष अंतर हे 300 किमी इतके आहे. नकाशात दाखविताना 1 सेमी = 100 किमी असे दाखविले असेल तर नकाशात या दोन ठिकाणांमधील अंतर 3 सेमी इतके असेल. जमिनीवरील प्रत्यक्ष अंतर व नकाशातील अंतर यांचे गुणोत्तर हेच नकाशाप्रमाण असते. मुलांनो, प्रमाणबद्ध व अचूक नकाशा काढण्यासाठी आपल्याला प्रत्यक्ष जमिनीवरील अंतर माहीत असणे आवश्यक असते. हे अंतर ज्यावेळी त्या भागाचे सर्वेक्षण केले जाते त्यावेळी मोजले जाते. जमिनीवरील प्रत्यक्ष अंतरानुसार योग्य ते गुणोत्तर प्रमाण नकाशा तयार करताना घेतले जाते. अंतर जास्त असेल तर 1 सेमीस जास्त किमी असे प्रमाण घेतले जाते. नकाशा तयार करून झाल्यावर या प्रमाणाची नोंद नकाशात करावीच लागते. कारण त्यामुळे नकाशाचे वाचन करणे व जमिनीवरील प्रत्यक्ष अंतर किती आहे? ते समजणे सोईचे होते.