नकाशाप्रमाण

करून पहा

views

4:20
एका विद्यापीठाच्या परिसरातील काही ठिकाणे दिली आहेत. पुतळा ते विद्यापीठाचे प्रवेशद्वार यांतील अंतर 0.5 किमी आहे. मुलांनो, आता आपण नकाशावरील अंतर मोजू व नकाशाप्रमाण किती आहे ते ठरवू ते प्रमाण तिन्ही स्वरूपात प्रमाणाच्या चौकटीत लिहू. नकाशातील या दोन ठिकाणांमधील अंतर 5 सेमी आहे. म्हणजेच नकाशाप्रमाण: 10 सेमी = 1 किमी इतके आहे. ते नकाशा प्रमाण तिन्हीं प्रकारात पुढील प्रमाणे दाखविले जाते. 1) शब्दप्रमाण = 10 सेमी = 1 किमी 2) अंकप्रमाण = 10 : 1 3) रेखाप्रमाण = 10 सेमी लांबीची रेषा काढा व 1 किमी लिहा. आपण ह्या आराखड्याच्या आधारे पुढील प्रश्न सोडवूया. समोर दिलेल्या ठिकाणांदरम्यानच्या रस्त्यांच्या आधारे अंतरांचा अभ्यास करू. त्यांच्या प्रत्यक्ष अंतरांची नोंद करू. 1) आरोग्य केंद्र ते ग्रंथालय - 0.7 किमी 2) तलाव ते सभागृह – 1 किमी 3) कार्यालय ते तलाव - 1.3 किमी 4) सभागृह ते कार्यालय – 1.3 किमी 5) आरोग्य केंद्र ते सभागृह – 1.6 किमी 6) तलाव ते ग्रंथालय - 0.4 किमी नकाशाप्रमाणाचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत: बृहद्प्रमाण आणि लघुप्रमाण नकाशे. जमिनीवरील मर्यादित भाग ज्या नकाशात जास्त जागा व्यापतो ते नकाशे बृहद्प्रमाण नकाशे असतात. उदा. शहर, गाव, शेत, मॉल, बगीचा, शाळा इत्यादींचे नकाशे ही बृहद्प्रमाण नकाशांची उदाहरणे आहेत. सर्वसाधारणपणे 1:10,000 पेक्षा लहान प्रमाण असलेले नकाशे बृहद्प्रमाण नकाशे म्हणून ओळखले जातात. नकाशाप्रमाणाचा दुसरा प्रकार म्हणजे लघुप्रमाणाचे नकाशे होय.