नकाशाप्रमाण

करून पहा

views

2:30
आपण एक प्रयोग करून पाहू. 1. या आपल्या वर्गाच्या भिंतीवर जमिनीपासून वर 180 सेमीपर्यंत खुणा करून घेतलेल्या आहेत. 2. आता आपण आपल्या वर्गातील विघ्नेश, रिया, सनी, आर्या व हितेश या पाच विदयार्थ्यांची याठिकाणी उंची मोजणार आहोत आणि त्याची नोंद करणार आहोत. 3. या पाच विद्यार्थ्यांचा याठिकाणी उभा राहून आपण काल फोटो (छायाचित्र) काढला होता. ते छायाचित्रही आपण आपल्यासोबत ठेवणार आहोत. नकाशाप्रमाण हे नकाशाचे महत्त्वाचे अंग आहे. आपण संपूर्ण पृथ्वीची किंवा पृथ्वीच्या ठराविक भागांची माहिती पृथ्वीगोल किंवा नकाशांच्या साहाय्याने घेऊ शकतो. जमिनीवरील प्रत्यक्ष अंतरे कागदावर घेण्यासाठी लहान प्रमाणात रूपांतरित करावी लागतात. त्यासाठी भूमिती व गणिती पद्धतींचा वापर केला जातो. त्यासाठी ‘नकाशाप्रमाण’ या अंगाचा उपयोग होतो. नकाशाप्रमाण नकाशात दर्शविणे आवश्यक असते. नकाशाप्रमाणामुळे नकाशात दर्शविलेल्या कोणत्याही दोन बिंदूमधील जमिनीवरील प्रत्यक्ष अंतर किती असेल याचा योग्यप्रकारे अंदाज बांधता येतो.