नकाशाप्रमाण

जरा विचार करा

views

3:12
नकाशात नकाशाप्रमाण वापरलेले असते. हे प्रमाण का बरे लिहित असतील? तर मुलांनो, नकाशात प्रमाण वापरले नाही, तर नकाशात दर्शविलेल्या कोणत्याही दोन बिंदूंमधील अंतर व जमिनीवरील प्रत्यक्ष अंतर यांच्यातील संबंध कळणार नाही. तर नकाशात प्रमाण वापरल्यामुळे नकाशा वाचन योग्यप्रकारे करता येते. त्याबरोबरच नकाशात प्रमाण वापरले असता, नकाशात दर्शवलेल्या कोणत्याही दोन बिंदूंमधील नकाशातील अंतर व जमिनीवरील प्रत्यक्ष अंतर यांचा योग्यप्रकारे अंदाज बांधता येतो. नकाशाप्रमाणाच्या बाबतीत लक्षात ठेवण्यासारख्या गोष्ट म्हणजे नकाशावर प्रमाण लिहित असताना डावी बाजू ही नकाशावरील अंतर दर्शविते. तर उजवी बाजू ही जमिनीवरील अंतर दर्शविते. जगातील वेगवेगळ्या देशांत मापनासाठी वेगवेगळी परिमाणे वापरली जातात. त्यामुळे नकाशाचे वाचन करीत असताना शब्दप्रमाण किंवा रेषाप्रमाणाचा वापर केला असता, अशा नकाशाच्या वाचनावर मर्यादा येऊ शकतात. म्हणून नकाशावर नेहमी अंकप्रमाण देणे योग्य ठरते. तसेच अंकप्रमाण हे वैश्विक प्रमाण असल्यामुळे त्याचा वापर केला असता, अशा नकाशाच्या वाचनावर कोणत्याही मर्यादा येत नाहीत. वैश्विक म्हणजे संपूर्ण विश्वात या पद्धतीचा वापर करतात.