नकाशाप्रमाण

नकाशाप्रमाण लिहिण्याच्या पद्धती

views

4:30
1) शब्दप्रमाण: ज्या प्रमाणात अंतर दर्शविण्यासाठी परिमाणदर्शक शब्द वापरले जातात, त्यास शब्दप्रमाण असे म्हणतात.’’ उदा.1 सेमी = 60 किमी असे प्रमाण असेल तर या प्रमाणातील सेंटिमीटर हे एकक नकाशातील अंतर तर किलोमीटर हे एकक जमिनीवरील अंतर दर्शविते. तसेच हे प्रमाण सेंटिमीटर व किलोमीटर अशा शब्दांचा वापर करून नकाशावर दर्शविले जाते. 2) अंकप्रमाण: अंकप्रमाणात प्रमाण दर्शविताना प्रत्यक्ष गुणोत्तराच्या स्वरूपात दर्शविले जाते. येथे शब्दांचा वापर अजिबात केला जात नाही. उदा. 1:60,00,000 (एकास 60 लाख) यामधील 1 हे नकाशातील अंतर आहे. तर 60,00,000 हे प्रत्यक्ष जमिनीवरील अंतर आहे. 3) रेषाप्रमाण: प्रमाणपट्टीच्या साहाय्याने नकाशावर रेषाप्रमाण दाखविले जाते. नकाशावरील कोणत्याही दोन ठिकाणांमधील प्रत्यक्ष अंतर रेषाप्रमाणाच्या साहाय्याने मोजता येते. नकाशावरील अंतर मोजण्यासाठी जर मोजपट्टी उपलब्ध नसेल तर कर्कटक, साधी गवताची काडी यांचा वापर केला जातो. नकाशावरील रेषा जर तिरपी/वक्र असेल तर धाग्याचा वापर करूनही आपल्याला दोन ठिकाणांमधील नकाशावरील अंतर प्रत्यक्ष मोजता येते.