ध्वनीचा अभ्यास

श्राव्य, अवश्राव्य व श्रव्यातीत ध्वनी

views

4:31
श्राव्य म्हणजे ऐकू येणारे ध्वनी. मानवी कानाची आवाज म्हणजेच ध्वनी ऐकण्याची मर्यादा 20Hz ते 20000Hz इतकी आहे. म्हणजेच या वारंवारितेमधील ध्वनी मानवाचे कान ऐकू शकतात. म्हणूनच या ध्वनीला श्राव्य ध्वनी म्हणतात. माणसाच्या दृष्टीने श्राव्य नसणारे काही सूक्ष्मआवाज कुत्र्याला एकु येतात. त्यामुळे त्याला कोणाचीही चाहूल आपल्या अगोदर लागते, हे तुम्ही अनुभवले असेल. अवश्राव्य ध्वनी: अवश्राव्य म्हणजेच ऐकू न येणारे ध्वनी. मानवी कान 20Hz पेक्षा कमी व 20000Hz. (20KHz) पेक्षा जास्त वारंवारिता असलेले ध्वनी ऐकू शकत नाही. म्हणून, 20Hz पेक्षा कमी वारंवारितेच्या ध्वनीस अवश्राव्य ध्वनी म्हणतात. दोलकाच्या कंपनाने निर्माण झालेला ध्वनी, भूकंप होण्यापूर्वी पृथ्वीच्या पृष्ठभागाची कंपने होऊन निर्माण झालेला ध्वनी हा 20Hz पेक्षा कमी वारंवारितेचा म्हणजेच अवश्राव्य ध्वनी आहे. व्हेल मासे, हत्ती, गेंडा या प्राण्यांमार्फत अवश्राव्य ध्वनी काढले जातात. म्हणून 20000Hz पेक्षा जास्त वारंवारितेच्या ध्वनीला श्रव्यातीत ध्वनी म्हणतात.