ध्वनीचा अभ्यास

निनाद

views

4:17
इमारतीचे छत किंवा भिंत यावरून ध्वनीतरंगाचे पुन्हा पुन्हा परावर्तन होऊन ध्वनीतरंग एकत्र येऊन सतत जाणवेल असा ध्वनी तयार होतो. त्याचा परिणाम ध्वनीचे सातत्य राहण्यात होते. यालाच निनाद असे म्हणतात. बरं, समजा तुम्ही रिकाम्या किंवा नुकत्याच बांधून पूर्ण झालेल्या बंदिस्त घरामध्ये गेलात. तर घरात गेल्यानंतर मित्राशी गप्पा मारताना तुम्हाला काय जाणवेल? आमचा आवाज घुमतो आहे असे वाटते. त्यामुळे बोललेले स्पष्ट ऐकू येणार नाही. परावर्तित ध्वनी एकापाठोपाठ एक ऐकू येतात आणि आवाज वाढत जातो. त्याचप्रमाणे रेडिओ किंवा म्युझिक सिस्टीमचा आवाज शक्य तितका मोठा केला तर परावर्तित ध्वनी एकमेकांच्या आड येतात. त्यामुळे गोंधळात टाकणारा व वाढत जाणारा आवाज ऐकू येतो. तो आवाज आपल्या कानाला सहनही होत नाही. यालाच निनाद असे म्हणतात.