ध्वनीचा अभ्यास

ध्वनीचे परावर्तन

views

4:24
ज्याप्रमाणे प्रकाशाचे परावर्तन होते तसेच ध्वनीचे परावर्तन होते. मात्र ध्वनीचे परावर्तन होण्यासाठी मोकळ्या जागेची गरज असते. ध्वनी परावर्तनाचे व प्रकाश परावर्तनाचे नियम सारखेच असतात. ध्वनी ज्या दिशेने जातो व परावर्तित होतो, त्या दिशा परावर्तक पृष्ठभागाच्या स्तंभिकेशी सारखेच कोन करतात व ते एकाच प्रतलात असतात. हे समजण्यासाठी आपण एक कृती करूया. आकृतीत दाखविल्याप्रमाणे एक कार्डबोर्ड घेऊन त्यापासून पुरेशा लांबीच्या दोन एकसारख्या नळ्या तयार करा. त्यानंतर टेबलावर भिंतीजवळ त्या नळ्या ठेवा. एका नळीच्या उघड्या टोकापाशी एक घड्याळ ठेवा. आणि दुसऱ्या नळीच्या बाजूने आवाज ऐकण्याचा प्रयन्त करा. हा ध्वनी ऐकण्यासाठी दोन्ही नळ्यातील कोन आकृतीत दाखविल्याप्रमाणे असू द्या. आता तुम्ही आपाती कोन (थिटा 1 व थिटा 2) θ1 व परावर्तन कोन θ2 मोजा. येथे आपाती कोन व परावर्तन कोन दोन्ही समान आहेत. म्हणून घड्याळाचा आवाज स्पष्ट ऐकू येतो. पण जर उजवीकडची नळी थोडी उचलली तर ध्वनी स्पष्ट ऐकू येणार नाही. ध्वनीच्या परावर्तनासाठी खडबडीत किंवा चकचकीत पृष्ठभागाची गरज असते.