ध्वनीचा अभ्यास

सोनोग्राफी

views

3:04
सोनोग्राफी या तंत्रज्ञानामध्ये श्रव्यातील ध्वनीतरंगाचा उपयोग करून शरीरांतर्गत भागाचे चित्रीकरण केले जाते. सोनोग्राफीमध्ये शरीराच्या आतील भागावर सूज येणे, जंतुसंसर्ग तसेच वेदनांची कारणे शोधली जातात. त्याचप्रमाणे हृदयाची स्थिती, हृदयविकाराच्या झटक्यानंतर हृदयाची अवस्था, तसेच गरोदर स्त्रीच्या गर्भाशयामध्ये होणारी गर्भाची वाढ पाहण्यासाठी या तंत्राचा वापर केला जातो. ही आकृती पाहा, (आकृती १२.५) या आकृतीमध्ये सोनोग्राफीचे यंत्र, तपासणी व सोनोग्राफीद्वारे कशी प्रतिमा मिळते ते दिसते. या तंत्रामध्ये एक छोटी शोधनी(probe) व एक विशिष्ट द्रव वापरला जातो. शोधनी व त्वचा यांच्यातील संपर्क योग्य प्रकारे व्हावा व श्रव्यातील ध्वनी पूर्ण क्षमतेने वापरला जावा म्हणून हा द्रव वापरला जातो. ज्या भागाचे परीक्षण करायचे आहे त्या भागावर त्वचेवर हा द्रव लावला जातो. शोधनीच्या साहाय्याने उच्च वारंवारितेचा ध्वनी शरीरामध्ये सोडला जातो. शरीराच्या आतील भागातून परावर्तित झालेला ध्वनी पुन्हा शोधनीच्या साहाय्याने एकत्र केला जातो व परावर्तित ध्वनीच्या मदतीने संगणक शरीराच्या आतील भागाचे चित्र तयार करतो. या तंत्रज्ञानामध्ये वेदना होत नाहीत. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात या तंत्राचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. आता सांगा बरं, श्रव्यातीत ध्वनीचा वैद्यकशास्त्रात कोणकोणत्या प्रकारे उपयोग केला जातो बरं?