अवकाश निरीक्षण दुर्बिणी

प्रस्तावना

views

05:46
एखादी लहान वस्तू मोठी दिसण्यासाठी आपण दुर्बिणीचा उपयोग करतो. आकाशातील व अवकाशातील बऱ्याच गोष्टी ठळकपणे पाहण्यासाठी दुर्बिणीचा उपयोग करतो. अवकाश शास्त्रज्ञ हे वेगवेगळ्या दुर्बिणींचा उपयोग करून विविध संकल्पनांविषयी माहिती मांडत असतात. तर या पाठामध्ये आपण अवकाशाचे दुर्बिणीच्या साहाय्याने निरीक्षण कसे केले जाते याविषयी माहिती अभ्यासणार आहोत. सर्वप्रथम तुम्ही मला सांगा: आकाश व अवकाश यामध्ये काय फरक आहे? आपल्या पृथ्वीभोवती असणारे वातावरण व त्यापलीकडचेही जे आपल्या डोळ्यांनी दिसू शकते त्याला आकाश म्हणतात. तर संपूर्ण विश्वातील घटक ज्या अमर्यादित अशा पोकळीत फिरतात अशा अनंत, अथांग जागेला अवकाश असे म्हणतात. आकाश व अवकाश यामध्ये निश्चित अशी सीमारेषा नाही. आकाश हे अवकाशाच्या तुलनेने लहान क्षेत्र असलेले आहे. बरं, आता सांगा: अवकाश निरीक्षण म्हणजे काय व त्याचे महत्त्व कशासाठी असते?