अवकाश निरीक्षण दुर्बिणी

रेडिओ दुर्बीण

views

02:56
अनेक खगोलीय वस्तूंमधून दृश्य प्रकाशाशिवाय रेडिओ लहरीसुद्धा निघत असतात. या लहरी आपण डोळ्यांनी पाहू शकत नाही. त्यामुळे या लहरी ग्रहण करण्यासाठी रेडिओ दुर्बीण वापरली जाते. रेडिओ दुर्बीण ही एका विशिष्ट आकाराच्या डिशपासून किंवा अशा अनेक डिशच्या संचापासून तयार केलेली असते. दृश्यप्रकाश दुर्बिणीप्रमाणेच या डिशच्या वक्रपृष्ठभागावरून रेडिओ लहरी परावर्तित होत असतात आणि त्या डिशच्या नाभी केंद्रापाशी एकत्रित केल्या जातात. तेथे या लहरी ग्रहण करू शकणारे एक यंत्र म्हणजेच Receiver बसवलेले असते. या यंत्राद्वारे ग्रहण केलेली माहिती संगणकाला दिली जाते. संगणक त्या माहितीचे विश्लेषण करून रेडिओ लहरींच्या स्रोताच्या स्वरूपाचे चित्र तयार करतो. तुम्ही तुमच्या घरातील डिश अँटेना पाहिला असेल. अगदी त्याचप्रमाणे हे यंत्र कार्य करत असते.