अवकाश निरीक्षण दुर्बिणी

भारतीय अंतरीक्ष अनुसंधान केंद्र Indian Space Research Organization (ISRO) बंगळूरू

views

02:35
बंगळूरू: इस्रो या संस्थेची स्थापना 15 ऑगस्ट 1969 मध्ये करण्यात आली. या संस्थेमध्ये कृत्रिम उपग्रह तयार करण्यासाठी व त्यांचे यशस्वी प्रक्षेपण करण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान विकसित केले जाते. भारताने अंतराळशास्त्रात जी प्रगती केली आहे त्यामध्ये इस्रोचे खूप मोठे योगदान आहे. याचे मुख्यालय अंतरीक्ष भवन बंगळूर येथे आहे. आणि याचे ब्रीदवाक्य ‘मानवी सेवेसाठी अंतराळ तंत्रज्ञान’ असे आहे. इस्रोने दूरसंचार (Telecommunication), दूरचित्रवाणी प्रसारण (Television Broadcasting) आणि हवामानशास्त्र-सेवा (Meteorological service) यासाठी इनसॅट (INSAT - Indian National Satellite System) व जीसॅट (GAST - Ghana Association of Science Teachers) या उपग्रह मालिका तयार केल्या आहेत. त्यामुळे देशात सर्वत्र दूरचित्रवाणी, दूरध्वनी व इंटरनेट या सेवा उपलब्ध होऊ शकल्या आहेत. याच मालिकेतील एडुसॅट (EDUSAT) हा उपग्रह फक्त शिक्षण क्षेत्रासाठीच वापरला जातो. देशातील नैसर्गिक संसाधनांचे, नियंत्रण व व्यवस्थापन (Monitoring and Management of natural Resources) आणि आपत्ती व्यवस्थापन (Disaster Management) यासाठी इस्रोने IRS ही उपग्रह मालिका तयार केली आहे. www.isro.gov.in या संकेतस्थळांवर आपण या उपग्रहांच्या मालिकेविषयी अधिक माहिती मिळवू शकतो.