अवकाश निरीक्षण दुर्बिणी

दुर्बिणी

views

04:26
सर्वसामान्यपणे लांबची वस्तू स्पष्ट पाहण्यासाठी दुर्बिणीचा उपयोग केला जातो. मात्र अवकाशातील काही वस्तू ह्या खूप दूर असतात. त्या पाहण्यासाठी दृश्य प्रकाश दुर्बिण वापरतात. तिची आता आपण माहिती घेऊ. दृश्य प्रकाश दुर्बिणी: दृश्यप्रकाश दुर्बिणीमध्ये कमीत कमी दोन किंवा त्यापेक्षा जास्त भिंगांचा वापर केला जातो. दृश्य प्रकाश दुर्बिणीमध्ये दोन प्रकारची भिंगे आहेत: पदार्थिक भिंग व नेत्रिका भिंग. खगोलीय वस्तूंपासून येणारा जास्तीत जास्त प्रकाश एकवटला जावा म्हणून पदार्थिक भिंग मोठ्या आकाराचे असते. आणि या एकवटलेल्या प्रकाशापासून खगोलीय वस्तूंची विशाल प्रतिमा तयार करणारे भिंग म्हणजेच नेत्रिका भिंग, हे लहान आकाराचे असते. प्रकाशकिरणे वातावरणातून भिंगात किंवा भिंगातून वातावरणात जात असताना आपला मार्ग बदलतात. म्हणजेच त्यांचे वक्रीभवन होते. म्हणूनच या दुर्बिणीला वक्रीभवन दुर्बीण असे म्हटले जाते. अशा प्रकारे आकाश निरीक्षणासाठी दृश्य प्रकाश दुर्बिणीचा उपयोग होतो. मात्र यामध्ये काही अडचणी आहेत.