दोन चलांतील रेषीय समीकरण

प्रस्तावना

views

05:13
मागील इयत्तेत आपण वर्गसमीकरणे किंवा समीकरणे कशी सोडवायची याचा अभ्यास केला आहे. त्याचीच उजळणी म्हणून आपण आता काही उदाहरणे सोडवूया. उदा. 1) m + 3 = 5 या उदाहरणात आपल्याला m ची किंमत काढायची आहे. मुलांनो या समीकरणात डावी बाजू व उजवी बाजू दिली आहे. (m + 3) ही उजवी बाजू व 5 ही डावी बाजू आहे. m ची किंमत काढण्यासाठी धन तीन हे बरोबर चिन्हाच्या विरुद्ध दिशेस गेल्यावर त्याचे ऋण तीन होतील. म्हणून 5 मधून 3 वजा करू. आता आपण दोन चलांतील रेषीय समीकरणे कशी सोडवतात त्याचा अभ्यास करूया. ज्या संख्यांची बेरीज 14 आहे अशा संख्या शोधा. त्या दोन संख्या नक्की कोणत्या आहेत हे आपल्याला माहीत नाही. म्हणून त्या संख्यांसाठी x व y ही चले वापरून उदाहरण सोडवू. x + y = 14 हे दोन चलांतील समीकरण आहे. येथे x व y या दोन्ही चलांच्या अनेक किंमती शोधता येतील. जसे की, 9+5=14, 7+7=14, 8+6=14, 4+10=14, (-1) +15=14, 15+(-1)=14, 2.6+11.4=14, 0+14=14, 100+(-86)=14, (-100) + (114) = 14 इत्यादी.