दोन चलांतील रेषीय समीकरण

पुढील उदाहरण उदाहरण 4)

views

05:31
उदाहरण 4: एका गावाची लोकसंख्या 50,000 होती. एका वर्षात पुरुषांची संख्या 5% ने वाढली व स्त्रियांची संख्या 3% ने वाढली.त्यामुळे यावर्षी लोकसंख्या 52,020 झाली. तर गेल्या वर्षी त्या गावात पुरुष किती होते व स्त्रिया किती होत्या? उकल: आधीच्या वर्षी गावातील पुरुषांची संख्या x व स्त्रियांची संख्या y होती असे मानू. पहिल्या अटीनुसार _ x + y = 50,000.......... समीकरण (1) समजा गावात 100 पुरुष आहेत. त्या गावात 5 पुरुष वाढले, तर त्या गावात एकूण नवीन 105 पुरुष होतील. म्हणजेच 100 मध्ये 5 वाढले तर 105 होतात. पुढे दिलेल्या आकृतीत बाणाजवळ काही सूचना लिहिल्या आहेत. त्यावरून मिळणारे समीकरण बाणांपुढील चौकटींत लिहा. चौकटींतील कोणतीही दोन समीकरणे घेऊन त्या समीकरणांची उकल काढा. उकलींचा पडताळा घ्या.