दोन चलांतील रेषीय समीकरण

दोन चलांतील रेषीय समीकरणांचे सामान्यरूप

views

03:42
ax + by + c = 0 या समीकरणात a, b, c या वास्तव संख्या असतील आणि a व b एकाच वेळी 0 (शून्य) नसतील तर हे समीकरण दोन चलांतील रेषीय समीकरणाचे सामान्यरूप असते. ax + by + c = 0 या समीकरणात दोन्ही चलांचा घातांक 1 आहे. म्हणून हे रेषीय समीकरण आहे. आता आपण काही उदाहरणे सोडवून समजून घेऊया. उदा 1) 3x + Y = 5 ---------- समीकरण (i) 2x + 3Y = 1----------- समीकरण (ii) वरील समीकरणात एका चलाचा लोप करण्यासाठी दोन्ही समीकरणांतील एकाही चलाचा सहगुणक समान किंवा विरुद्ध संख्या नाहीत. म्हणून आपण सहगुणक समान करून घेवू x चा सहगुणक 3 आहे म्हणून समीकरण (i) च्या दोन्ही बाजूंना 3 ने गुणूया.