दोन चलांतील रेषीय समीकरण

एकसामायिक समीकरणे

views

05:23
एकसामायिक समीकरणे: x + y = 14 --------(I), x - y = 2 ---------- (II) वरील समीकरणांत समीकरण I च्या उकली (9,5) (7,7), (8,6) आहेत. आणि समीकरण II च्या उकली (7,5), (-2,-4), (0,-2), (8,6) या आहेत. दोन्ही समीकरणांच्या उकलींचे निरीक्षण केले तर दिसून येते की, (8,6) ही जोडी दोन्ही समूहांत सामाईक आहे. म्हणून ती या दोन्ही समीकरणांची सामाईक उकल आहे. म्हणजेच जेव्हा दोन चलांतील दोन रेषीय समीकरणांचा एकाच वेळी विचार करून त्यांची सामाईक उकल मिळते तेव्हा त्या समीकरणांना एकसामायिक समीकरणे म्हणतात. कृती: खाली दिलेल्या चष्म्यांच्या काचांवर योग्य संख्या लिहा., उदा. 1) या काचांवर अशा संख्या लिहा की त्यांची बेरीज 42 व वजाबाकी 16 आहे. उकल: मुलांनो, आपल्याला अशा संख्या शोधायच्या आहेत की ज्या दोन संख्यांची बेरीज 42 व वजाबाकी 16 असेल. 29 व 13 या दोन संख्या जर घेतल्या तर त्यांची बेरीज 42 व वजाबाकी 16 येते